Posts

छत्रपती शिवराय ह्यांची राज्यव्यवस्था

Image
  शिवाजी महाराजांची राज्य व सैन्यव्यवस्था 'बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले' असे म्हणतात. शिवाजी महाराजांनी या उक्तीला आपल्या जीवनात नेहमीच पाळले. त्यांच्या लढाया, पराक्रम, किल्ले, आग्र्याहून सुटका, अफझलखान वध असे सर्वच प्रसिध्द आहे. त्यांचा पराक्रम डोळ्यांसमोर ठेवताना आपण 'त्यांचे प्रशासन' या गोष्टीकडे मात्र थोडेफार दुर्लक्ष करतो. त्यांच्यावर या नेहमीच्या विषयांवर लिहिण्यापेक्षा आज या लेखात मी त्यांच्या सैन्यव्यवस्था व राज्यकारभाराबाबतीत थोडेफार लिहायचा प्रयत्न करेन. त्यांच्या प्रशासनाबद्दल लिहिताना त्या काळच्या महाराष्ट्राची थोडीफार ओळख या निमित्ताने होईल. शिवाजी महाराजांना सामाजिक क्रांती अभिप्रेत नव्हती. शिवकालीन सामाजिक जीवन शिवपूर्वकालाहून फार भिन्न होते वा ते नंतर बदलले असे म्हणता येणार नाही. त्यांनीदेखील रूढ असणार्‍या परंपरा व पध्दतींचाच अवलंब केला, पण तो करताना समाजातील सर्व घटकांना, संस्थांना त्यांनी त्यांच्या कर्तव्याची जाणीव करून देऊन सामाजिक स्थैर्य आणण्याचा प्रयत्न केला, म्हणून शिवाजी महाराज वेगळे. स्वराज्यवॄध्दीबरोबरच त्या प्रदेशाची शासकीय व्यवस्था लावण